कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्गात दुर्मिळ ''काळतोंड्या'' सापाचा आढळ

11:21 AM Jun 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मणचे गावात निसर्गाची अनोखी भेट, गावात आढळला दुर्मिळ साप

Advertisement

आचरा | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मणचे गावात दुर्मिळ प्रजातीचा ‘काळतोंड्या’ साप आढळून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आणि वनविभागात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सापाचा आढळ हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मणचे गावात Dumeril's Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाचा साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे . हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आढळून आला. त्यांना वन्यजीवनिरीक्षणाची आवड आहे. साप दिसताच त्यांनी तत्काळ त्या सापाचे व्हिडिओ आणि फोटो घेतले. आणि योग्य ओळख पटविण्यासाठी चिंदर गावचे वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला. स्वप्नील गोसावी यांनी या सापाची 'काळतोंड्या' (Dumeril's Black-headed Snake) अशी ओळख पटवली.हा साप अंदाजे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचा असून, त्याच्या डोक्यावर काळया रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला "काळतोंड्या" असे म्हणतात. हा साप बिनविषारी असून स्वभावाने लाजरा आहे. त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो. पाली, सापसुरळी हे त्याचं खाद्य आहे. ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली असून याबाबतचे नियमित नोंदवहीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे मणचे परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्त्वाची नोंद ठरतो. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, अशा दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन आणि त्यांच्याविषयीची जागरूकता ही काळाची गरज असल्याचे प्राणीमित्र वन्यजीव छायाचीत्रकार डॉ श्रीकृष्ण मगदूम माहिती देताना म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # snake # sindhudurg update # marathi news
Next Article