कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोटारसायकल चोरासोबत दुर्मिळ ‘इंडियन ब्लॅक टर्टल’ जप्त

11:53 AM Jul 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सातारा :

Advertisement

सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोटारसायकल चोरीप्रकरणी एकाला अटक केली. विशेष म्हणजे, या चोराकडून चोरीची मोटारसायकल तर हस्तगत करण्यात आलीच, शिवाय त्याच्याकडील पिशवीतून ‘इंडियन ब्लॅक टर्टल’ (Indian Black Turtle) जातीचे एक दुर्मिळ कासवही जप्त करण्यात आले. हे कासव भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत शेड्यूल-1 मध्ये संरक्षित असलेल्या प्रजातींपैकी एक आहे.

Advertisement

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, पाटण तिकाटने–चाफळ रोड मार्गे एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन उंब्रजच्या दिशेने येणार आहे. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.

गुरुवार, १७ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि उंब्रज पोलिसांच्या सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकाने संयुक्तपणे उंब्रज येथील चाफळ फाटा–माजगाव फाटा रोड येथील हॉटेल मैत्री पार्क जवळ सापळा रचला. त्या वेळी बातमीप्रमाणेच एक संशयित इसम मोटारसायकलवरून येताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ती मोटारसायकल सातारा एमआयडीसी येथून चोरल्याचे कबूल केले.

चौकशीदरम्यान पोलिसांचे लक्ष त्या इसमाच्या मोटारसायकलच्या हँडलला टांगलेल्या पांढऱ्या पिशवीकडे गेले. त्यामध्ये हालचाल दिसून आल्याने तपासणी केली असता, त्या पिशवीत कासवसदृश वन्यजीव आढळून आला. याबाबत विचारणा केली असता, संबंधित इसमाने ते नदीत सापडले असून योग्य ग्राहक मिळाल्यास विक्री करणार असल्याचे सांगितले.

यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ते कासव ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव गणेश प्रवीण चव्हाण (वय २०, रा. पाडळोशी, ता. पाटण, जि. सातारा) असे आहे. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, चोरीच्या मोटारसायकलप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आधीच दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उल्लेखनीय आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, डॉ. कडुकर आणि श्री. दोशी यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

या कारवाईत स.पो.नि. रोहित फार्णे, पो.उप.नि. विश्वास शिंगाडे, सपोनि रवींद्र भोरे, पो.उप.नि. गणेश भोसले यांच्यासह वन विभागाचे सुहास भोसले, रमेश जाधवर, संतोष जाधवर आणि अनेक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article