महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार! जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल

02:04 PM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Vishrambag
Advertisement

विश्रामबाग पोलिसांकडून तपास सुरू
सांगली प्रतिनिधी
कोल्हापूर येथे शासकीय नोकरी करणाऱ्या एका युवतीला सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून विश्रामबाग परिसरातील एका फ्लॅटमध्ये सलग तीन महिने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघा संशयितांवर बलात्कार आणि अनुसुचित जाती आणि जमाती अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन संभाजी गायकवाड (वय 25, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि अमोल कुरणे ( रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदरची युवती ही शासकीय कामानिमित्त सांगलीत मार्च 2024 ते जून 2024 या कालावधीत एका ठिकाणी रहात होती. त्याचवेळी तिची ओळख सचिन गायकवाड याच्याबरोबर सांगलीत झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यातूनच संशयित सचिन गायकवाडने फिर्यादीसमवेत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढवली. पिडीतेचा विश्वास संपादन केल्यावर संशयित सचिनने तिला विश्रामबाग येथील शंभर फुटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये वारंवार शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
कालांतराने फिर्यादीने संशयित सचिनला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला जातीवाचक टिप्पण्णी करून लग्नास नकार दिला. दरम्यान फिर्यादीने संशयितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. परंतु संशयित अमोल कुरणेने सचिन समवेत तुझे लग्न होणार नाही. त्या बदल्यात पिडीतेस एक लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पिडीतेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल केली. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
Raped a young womanregisteredthe case of caste abuse
Next Article