For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्र्रदेशात आणखी एका सप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा

06:17 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्र्रदेशात आणखी एका सप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा
Advertisement

सहकारी महिलेनेच तक्रार केली दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. माजी प्रदेश सचिव आणि मऊ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वीरेंद्र बहादुर पाल विरोधात बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. सप नेत्याच्या महिला सहकाऱ्यानेच बलात्काराची तक्रार केली आहे. व्हिडिओ अणि फोटो काढून ब्लॅकमेलिंग केले जात असून मागील एक वर्षापासून बलात्कार होत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.

Advertisement

याप्रकरणी मऊ जिल्ह्यातील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सप नेत्याने 6 सप्टेंबर रोजी पीडितेला तिच्या चेम्बरमध्ये जात मारहाण केली होती. त्यावेळी सप नेत्याने बलात्काराची तक्रार न नोंदविण्याची धमकी दिली होती. आता पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

यापूर्वी अयोध्या आणि कनौजमध्ये पक्षाच्या दोन नेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे. अयोध्येच्या पुरा कलंदर भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत सप नेत्याने तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. मग या ब्लॅकमेलिंग करत या मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी सप नेता मोईद खानला अटक करण्यात आली आहे. तर कनौजमध्ये सप नेते नवाब सिंह यादववर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.