For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राव युवा अकॅडमीचे कलर बेल्ट चाचणीत यश

10:29 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राव युवा अकॅडमीचे कलर बेल्ट चाचणीत यश
Advertisement

बेळगाव : कर्नाटक ऑलम्पिक संस्था व इंडिया तायक्वांदोशी संलग्न असलेल्या कर्नाटक तायक्वांदोचे बेळगावी जिल्हा तायक्वांदो संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 34 वी तायक्वांदो कलर बेल्ट प्रमोशन चाचणी अकॅडमीचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र काकती येथे  उत्साहात पार पडली.तायक्वांदो प्रशिक्षक व पंच तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांच्या देखरेखीखाली राव युवा अकॅडमीची या बेल्ट प्रमोशन चाचणीत पवनराज दड्डीकर आणि वेदांत खडबडी यांनी रेड-वन बेल्ट रँक साठी, आऊष टुमरी, मोहम्मदसोहेब चांदशाह आणि घगन शिवपूजीमठ यांनी रेड बेल्ट रँक साठी, अवनीश गडदे, मोहम्मशफी चांदशाह, सान्वी पाटील, स्तुती टुमरी यांनी ब्लू-वन बेल्ट रँकसाठी, अथर्व मांगले, ऊपल रेवणकर, अर्जुन गडदे, अवनी धोंगडी यांनी ब्लू बेल्ट रँकसाठी, तन्विक शिरहट्टी, साईदीप पाटील, श्राव्या भातकांडे, दीप पाटील, सान्वी वासोजी, ऊग्वेद पाटील, आर्या हंजे, श्रीयांस न्यामगौड, आऊष हंजे, अनिका मुनवळी, सानवी वागुकर, हर्ष वैष्णव,

Advertisement

इशान पाटील यांनी ग्रीन-वन बेल्ट रँकसाठी, निशिका पात्रा, अन्वी बागी, अनन्या डोळेकर, रौनक उपासी, अद्विक बागी, ओविया चौधरी, अद्विका मांगले, स्फूर्ती तालुकर, कनिशा जैन, सोयरा घाडी यांनी ग्रीन बेल्ट साठी तर उर्वरित खेळाडू विहान कामटे, तनिश चंद्रकांत राव, आयुष साळुंके, अंकित भजंत्री, संचित बजंत्री, विनायक जमखंडी, मोहम्मद साद इंचनाळकर यांनी यलो बेल्ट रँक साठी मेहनत घातली. या चाचणीत, ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन क्रीडापटू त्रिवेणी बदकन्नवर आणि फर्स्ट पूम (14 वर्षाखालील ब्लॅक बेल्ट) क्रीडापटू स्पर्श भोसले यांनी त्यांचा ब्लॅक बेल्ट रँक कायम ठेवण्यासाठी आपापल्या फिटनेस टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. बेळगाव जिल्हा तायक्वांदो संस्थेचे सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच अॅड. प्रभाकर दिलीपकुमार शेडेबाळे यांनी राव युवा अकादमीला भेट देऊन या परीक्षेच्या संचालनाची पाहणी केली. जिल्हा संघटनेचे सहसचिव स्वप्नील पाटील आणि खजिनदार वैभव पाटील यांनी या चाचणीत परीक्षक म्हणून काम पाहिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.