'रणवीर'ची कॉन्ट्रव्हर्सि पडली महागात, 'शो'वर बंदीची मागणी
'तो' एपिसोडही होणार डिलीट
कॉमेडीयन समय रैना याचा ;इंडियाज गॉट लेटेंट; हा शो सध्या चांगलाच चर्चेत रंगला आहे. याच शोमध्ये यु ट्युबर रणवीर अलाहबादीयाने विचारलेल्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या शोमधील सहभागी स्पर्धकाला रणवीर अलाहबादीयने पालकांबद्दल आक्षेपार्य प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नानंतर सगळीकडेच खळबळ उडाली आहे.
या शोमध्ये रणबीर ने स्पर्धकांना विचारले की, "कोणाला आपल्या पालकांना इंटिमेट होताना पाहायला आवडेल, त्यांना साथ द्यायला आवडेल?" त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मोठी कॉन्ट्रव्हर्सि निर्माण झाली आहे. यानंतर सूचनेनुसार इंटरनेटवरून रणवीरचा हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला आहे. रणवीरने या वक्तव्याबद्दल सर्वांची जाहीर माफीही मागितली आहे. रणवीरने "कोणतेही स्पष्टीकरण, कारण न देता मला माफ करा असे म्हणत माफी मागितली आहे. सोबतच ते आक्षेपार्ह भाग व्हिडीओतून डीलीट करावा", अशी विनंतर इंडियाज गॉल लेटेन्ट यांना केली आहे.
समय रैनाचा "इंडियाज गॉट लेटेंट" हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोमुळे अनेकदा कॉर्न्ट्रव्हर्सि निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा रणवीर अलाहबादीयाच्या या प्रश्नामुळे नवा वाद उफाळून आला आहे. या शोच्या नवीन भागात यूट्युबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा रणवीर अलाहबादिया यांसारखे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
या शोमध्ये सहभागी असलेल्या कॉमेडियन्सच्या पॅनेलवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात काही संघटनांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्रात समय रैना आणि रणवीर अलाहबादीया यांच्यावर कारवाई करावी असेही म्हटले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर दाखल केली असून पुढील तपास चालू आहे.
या प्रकरणी एकूण ३० जणांविरोधत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.