एशियनमध्ये ‘जीत’ बेळगावचा रणजीत
आपल्या पिळदार शरीरयष्टीवर रेल्वेत मैलाचा दगड मारुन बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या मि. इंडिया आणि एकलव्य पुरस्कारासाठी पात्र मात्र थोडक्यात हुकलेल्या, साऊथ एशियन शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता, रणजीत किल्लेकर याचा प्रवास थक्क करणारा आहे. रणजीत किल्लेकरने आपले शालेय शिक्षण मुजावर गल्लीतील मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक 3 मध्ये, माध्यमिक शिक्षण बी.के. मॉडेल तर आरपीडी महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण घेतले. लहानपणापासून क्रिकेट व फुटबॉल सारख्या खेळांची आवड होती. पदवीपूर्व स्पर्धेत क्रिकेटमध्ये महाविद्यालयामध्ये सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. वडिलांच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनाने त्याने व्यायामाकडे वळले आणि याच संधीचे त्यांनी सोने केले. कै. केदारी मल्हारी किल्लेकर (माजी शरीरसौष्ठवपटू) बेळगाव श्र।r, बेळगाव हेर्क्युलर्स, म्हैसूर श्री, अनेक पदक विजेते हे रणजीत किल्लेकर यांचे वडील होत.यांच्या सहवासात रणजीत यांची तालिमची सुरुवात झाली. भरत बाळेकुंद्री व भरत काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीतने आपल्या व्यायामाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली. मि. इंडिया सुनील आपटेकर यांचे प्रशिक्षण मोलाचे ठरले.
या कारकिर्दीमध्ये त्यांना मार्गदर्शन बेळगावचे भूषण एकलव्य पुरस्कार विजेते मि. इंडियाचा सुनील आपटेकर व रेल्वेचे प्रशिक्षक माणीक लाल यांचे मार्गदर्शन लाभले. रणजीत किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावमध्ये शरिरसौष्ठवपटू घडविले व संध्याचे युवकांना त्यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली.रणजीत किल्लेकर यांची इंडियन बॉडीबिल्डींग असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय पंच म्हणून निवड करण्यात आली. रणजीत किल्लेकर यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या भावंडांचे व पॉलिहैड्रॉनचे मालक कै. सुरेश हुंदरे, विनायक कडोलकर अनिल पोतदार, रवी पाटील, भाऊ नाकाडी, पोयाण्णा कुन्नुरकर, बेळगाव डिस्ट्रीक बॉडी बिल्डर असोसिएशन अॅण्ड स्पोर्ट्स व कर्नाटका स्टेट बॉडी बिर्ल्डींग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कामगिरीची दखल घेत एकलव्य पुरस्कारासाठी बेळगावातून रणजीतचे नाव घोषित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव त्यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. सध्या साऊथ वेस्टन रेल्वे मुख्य तिकीट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-उमेश मजुकर