For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रंगपालटू’ मतदारसंघ

06:31 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रंगपालटू’ मतदारसंघ
Advertisement

? चौथ्या टप्प्यात ‘रंगपालटू“ मतदारसंघांची संख्या मागच्या तीन टप्प्यांपेक्षाही मोठी आहे. रंगपालटू याचा अर्थ स्विंग किंवा ज्या मतदारसंघांमध्ये कोणताही एक पक्ष सातत्याने जिंकत नाही, असा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या एकंदर परिणामांवर या मतदारसंघांचा मोठा प्रभाव पडतो. अशा सातत्याने निष्ठा पालटणाऱ्या मतदारसंघांपैकी जो पक्ष अधिक मतदारसंघ जिंकतो त्याला एकंदर जागांचा लाभ अधिक होण्याची शक्यता असते, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

Advertisement

? असे एकंदर 24 मतदारसंघ या टप्प्यात आहेत. काही तज्ञांनी त्यांची सूची दिली आहे. त्यानुसार अमलापूरम, अनकापल्ली, अनंतपूर, बापटला, एलुरु, काकीनाडा, नरसापूरम, राजमुंद्री, विशाखापट्टणम, खम्माम हे तेलंगणातील आणि आंध्र प्रदेशातील आहेत. श्रीनगर हा जम्मू-काश्मीरमधील आहे. तर मुंगेर बिहारमधील आहे. याशिवाय मालकगिरी, सिंगभूम, आदिलाबाद, बरद्वान-दुर्गापूर, कलहंडी, करीमनगर, निझामाबाद, बहरामपूर, कडाप्पा आदी मतदारसंघ आहेत.

कोणत्या पक्षाला किती मते...

Advertisement

? भारतीय जनता पक्षाने चौथ्या टप्प्यातील 96 मतदारसंघांपैकी 89 जागांवर मागच्या वेळी स्पर्धा केली होती. त्यांच्यापैकी 44 मतदारसंघांमध्ये या पक्षाने 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळविली आहेत. तर काँग्रेसला 44 मतदारसंघांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे काँग्रेससमोर अधिक जटील आव्हान असल्याचे पहावयास मिळत आहे.

भाजपची उत्तरोत्तर प्रगती

? या टप्प्यात जे मतदारसंघ आहेत, त्यांच्यात भारतीय जनता पक्षाने गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तरोत्तर प्रगती केलेली दिसते. 2004 मध्ये या 89 मतदारसंघांपैकी या पक्षाने 10 जागा जिंकल्या होत्या. 2009 मध्येही केवळ 10 जागाच या पक्षाच्या वाट्याला आल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 38 वर पोहचली. 2019 मध्ये ती वाढून 42 पर्यंत पोहचली आहे. काँग्रेसचा प्रवास याच्या उलट झालेला आहे. 2004 मध्ये 35 आणि 2009 मध्ये 50 जागा या पक्षाने या टप्प्यात जिंकल्या होत्या. 2014 मध्ये ही संख्या अवघ्या 3 वर आली आणि 2019 मध्ये ती 6 झाली होती. परिणामी, हा टप्पा या दोन्ही पक्षांसाठी मोठे महत्व असणारा आहहृ असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

.