मुंबई सिटीशी राणे करारबद्ध
06:01 AM Jun 22, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ मुंबई
Advertisement
2024 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाने मध्यफळीत खेळणाऱ्या जयेश राणे बरोबर नुकताच नवा करार केला आहे.
Advertisement
मुंबई सिटी एफसी संघाने जयेश राणे बरोबर एक वर्षाच्या कालावधीसाठी हा नवा करार केला आहे. यापूर्वी राणे बेंगळूर एफसी संघाकडून खेळत होता. इंडियन्स सुपर लीग फुटबॉलच्या इतिहासामध्ये जयेश राणे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीन विविध संघांना इंडियन सुपर लीगचे अजिंक्यपद मिळाले आहे. 2016 साली चेन्नियन एफसी संघाने आयएसएल स्पर्धा जिंकली होती आणि राणेचा या संघात समावेश होता. गेल्या वर्षी आयएसएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई सिटी एफसी संघामध्ये राणेचा सहभाग होता. 2019-20 साली अॅटलेटिको डी कोलकाता संघाने आयएसएल स्पर्धा जिंकली होती. आणि त्या संघात राणेचा समावेश होता.
Advertisement
Next Article