For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केसरकरांची साथ ; नारायण राणेंची राऊतांवर मात

05:04 PM Jun 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
केसरकरांची साथ   नारायण राणेंची राऊतांवर मात
Advertisement

सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना 28 हजाराहून अधिक मतांचे मताधिक्य

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत मतदारसंघात दिलेली भक्कम साथ फलदायी ठरली आहे. या मतदारसंघात केसरकर यांच्या सहकार्यामुळे राणेंना 28 हजाराहून अधिक मताधिक्य मिळाल्या आहे. यापूर्वी या मतदारसंघात 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे विनायक राऊत यांना साथ दिली होती. त्यावेळी विनायक राऊत यांना या मतदारसंघात 41 हजार ते मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना केसरकर यांनी पुन्हा सहकार्य केले त्यामुळे राऊतांना 29 हजाराचे मताधिक्य सावंतवाडी मतदारसंघात मिळाले होते. परंतु, केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत महायुतीचे सरकार राज्यात स्थापन केले . त्यात केसरकर मंत्री झाले. या लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी राणे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. भाजपनेही राणे यांना शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली. सावंतवाडी मतदारसंघात केसरकर यांच्या मतदारांचे राणेंना सहकार्य मिळते की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत होती. परंतु केसरकर यांना मानणाऱ्या मतदारांनी राणे यांना साथ दिली त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात राणे यांना अठ्ठावीस हजारहून अधिकचे मताधिक्य मिळाले. केसरकर यांची राणेंना मिळालेली भक्कम साथ राणेंच्या दृष्टीने फलदायी ठरली आहे. 2014 च्या निवडणुकीपूर्वी केसरकर राष्ट्रवादीत होते . परंतु केसरकर यांचे राणे यांच्याबरोबर वितुष्ट निर्माण झाले होते. नंतर केसरकर यांनी राणेचे सुपुत्र निलेश राणे यांच्या विरोधात 2014 च्या निवडणुकीत काम केले होते . त्यामुळे निलेश राणे यांचा पराभव झाला होता यापूर्वी केसरकर यांना नारायण राणे यांनी 1999 मध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि नंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत केसरकर यांना सहकार्य केले होते. या सहकार्याची परतफेड या निमित्ताने केसरकर यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.