कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॉलिवूडपटात रणदीप हुड्डा

06:32 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा पुन्हा हॉलिवूड चित्रपटात दिसून येणार आहे. अॅप्पल ओरिजिनल फिल्म्सचा आगामी अॅक्शन थ्रिलर ‘मॅचबॉक्स’मध्ये दिग्दर्शक सॅम हार्ग्रेव यांच्यासोबत रणदीप काम करणार आहे. या चित्रपटात जॉन सीना देखील असणार आहे. रणदीपने यापूर्वी सॅम यांच्यासोबत ‘एक्सट्रॅक्शन’ चित्रपटात काम केले होते. लाइव्ह-अॅक्शन चित्रपट हा मॅटलच्या लोकप्रिय मॅचबॉक्स टाय व्हीकल लाइनने प्रेरित असून यात हॉलिवूड कलाकार टेयोना पॅरिस, जेसिका बील आणि सॅम रिचर्डसन देखील असेल. सध्या या चित्रपटाचे काम बुडापेस्ट येथे सुरु आहे. हा चित्रपट प्रसिद्ध मॅचबॉक्स कार लाइनवर आधारित असून याची सुरुवात 1953 मध्ये झाली होती, जेव्हा जॅक ओडेल यांनी स्वत:च्या मुलीसाठी माचिसच्या पेटीत फिट होईल अशी खेळणी तयार केली होती. जगभरात दर सेकंदाला दोन मॅचबॉक्स कार्स विकल्या जातात.

Advertisement

हार्गेवसोबत पुन्हा काम करण्यासाठी रणदीप उत्सुक आहे. एक्सट्रॅक्शनमध्ये काम करताना आम्ही एकत्र चांगला वेळ घालविला होता. सॅम हाय-ऑक्टेन स्टोरीटेलिंग आणि अॅक्शनचा मास्टर असल्याचे रणदीपने म्हटले आहे. रणदीप आगामी काळात जाट या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच अर्जुन उस्तरा या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article