For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्यांदा कॅमेरासमोर आली रणबीर आलियाची लेक; सोशल मीडियावर 'राहाची' चर्चा

04:23 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
पहिल्यांदा कॅमेरासमोर आली रणबीर आलियाची लेक  सोशल मीडियावर  राहाची  चर्चा
Advertisement

ख्रिसमसनिमित्त रणबीर आणि आलियाने चाहत्यांना अत्यंत गोड सरप्राइज दिलं आहे. एक वर्षानंतर अखेर रणबीर आणि आलियाने त्यांची मुलगी राहाला पापाराझींसमोर आणलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राहाची जोरदार चर्चा सुरु आहे.हाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement

ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येतं. यावेळी कपूर कुटुंबीयांच्या लंचला जाण्यापूर्वी रणबीर-आलियाने राहाला पापाराझींसमोर आणलं.राहाने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. राहा ही तिचे आजोबा आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यासारखीच दिसते, अशी कमेंट अनेकजण करत आहेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला.रणबीर आणि आलियाने आतापर्यंत राहाचा फोटो कुठेच पोस्ट केला नव्हता. पण आता वर्षभरानंतर त्यांनी राहाला सर्वांसमोर आणलं आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.