‘नीलांबरी पदयप्पा 2’मध्ये राम्या कृष्णन
रजनीकांत यांच्याकडून सीक्वेलची घोषणा
‘पदयप्पा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अलिकडेच 25 वर्षे पूर्ण झाली असून आता रजनीकांत यांनी याच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. के.एस. रविकुमार यांच्या दिग्दर्शनातील मूळ चित्रपट प्रचंड गाजला होता, यात राम्या कृष्णन यांनी नीलांबरी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
रजनीकांत यांनी आता या प्रोजेक्टशी निगडित स्वत:च्या आठवणी व्यक्त करत 37 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्वत:च्या 50 वर्षांच्या करियरमध्ये मी कधीच महिलांना चित्रपट पाहण्यासाठी गेट तोडताना पाहिले नव्हते, परंतु पदयप्पा चित्रपटावेळी महिलांनी हे धाडस केले होते असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.
जेव्हा मी 2.0 आणि जेलर 2 यासारखे सीक्वेल पाहतो, तेव्हा पदयप्पा 2 का नाही असा प्रश्न स्वत:ला विचारतो. या नव्या चित्रपटाचे नाव ‘नीलांबरी : पदयप्पा 2’ असेल. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल आणि यावर मी काम करत आहे असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.