व्ही. शांताराम’ चित्रपटात तमन्ना
सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत
दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्ये सिद्धांत चतुर्वेदी हा मुख्य भूमिका साकारणार आहे. तर नायिकेच्या भूमिका तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. निर्मात्यांनी सिद्धांत आणि तमन्नाचा फर्स्ट लुक सादर केला आहे. चित्रपटात तमन्ना ही जयश्री ही व्यक्तिरेखा साकारत आहे. पोस्टरमध्ये तमन्नाचा विंटेज लुक दिसून येतोय.
जयश्री या चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री होत्या. तमन्ना या व्यक्तिरेखेद्वारे इतिहासातील एक पान उलगडणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. या पोस्टरमध्ये तमन्ना ही गुलाबी रंगाच्या साडीत दिसून येत आहे. सिद्धांत या चित्रपटात व्ही. शांताराम यांची व्यक्तिरेखा साकारतोय. भारतीय चित्रपटाला नवे रुप देणारा क्रांतिकारक आता परतला असल्याचे म्हणत निर्मात्यांनी त्याचे पोस्टरही शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे करत आहे.
व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांनी मूकपटांपासून रंगीत चित्रपटांच्या काळापर्यंत अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण केले. तसेच त्यांच्या चित्रपटांमध्ये मनोरंजनासोबत समाजाचे सत्य आणि बदल दिसून यायचा. याचमुळे व्ही. शांताराम यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला रिबेल म्हटले जाते.