कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जेलर 2’मध्ये राम्या कृष्णन

06:48 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ

Advertisement

दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री राम्या कृष्णन पुन्हा एकदा सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून देण्यास तयार आहे. अलिकडेच तिने जेलर 2 या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करत आहे. राम्याने इन्स्टाग्रामवर चित्रिकरणाच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे शेअर केली आहेत.

Advertisement

पदयप्पाला 26 वर्षे आणि जेलर 2 च्या चित्रिकरणाचा पहिला दिवस अशी कॅप्शन तिने दिली आहे. चित्रत्रपटात राम्या ही रजनीकांत यांची व्यक्तिरेखा मुथुवेल पांडियनची पत्नी विजया पांडियन उर्फ विजीच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

जेलर 2 चे चित्रिकरण सध्या केरळच्या अट्टापडीमध्ये सुरू आहे. चित्रिकरणासाठी रजनीकांत यापूर्वीच तेथे पोहोचले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री मिरना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सन पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाचे चित्रिकरण सर्वप्रथम चेन्नईत सुरू झाले होते आणि आता हे केरळमधील सुंदर ठिकाणी पार पडत आहे.  जेलर हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने 348.55 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामुळे निर्मात्यांनी याचा सीक्वेल निर्माण करण्याची घोषणा केली होती.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article