कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Viral Call Record : रामराजे अन् 'त्या' महिलेचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, प्रकरणाला नवे वळण?

05:59 PM May 04, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे आणि त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले आहे

Advertisement

सातारा : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ऐन अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर त्यांच्यावर 2017 मधील प्रकरण उकरून काढून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामध्ये पुढे आरोप करणारा 'तो' युट्युबर आणि 'ती' महिला ही विविध गुन्ह्यात अटकेत आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला असून विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे आणि त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले आहे. त्यामुळे हा फोन कॉल नेमका कोणी रेकॉर्ड केला? कोणी व्हायरल केला? पुढे या रेकोर्डवरून नेमकी काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement

सातारा जिल्ह्यात माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांचे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे यांचे शत्रुत्व अवघ्या जिल्हावासियांना माहिती आहे.दोघांचाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हा प्रत्येक निवडणुकी वेळी रंगलेला विषय असायचा. एकाने डाव टाकायचा आणि दुसऱ्यांनी प्रतिडाव. त्यातून कसे निसटायचं हे सुरू असायचे. माण विधानसभा मतदारसंघ जयकुमार गोरे यांनी या सर्व राजकारणाला पुरून उरून 2024 निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, मंत्री झाल्यानंतर त्यांच्यामागे खरे झेंगट अर्थ संकल्पीय अधिवेशनावेळी सुरू झाले.

2017 मध्ये घडलेल्या प्रकरणावरून आरोप सुरू झाले. एकेक गुंता वाढत गेला. विधिमंडळात जोरदार चर्चा झाली. राज्याचे विरोधी नेते त्यामध्ये सहभागी होऊन मंत्री जयकुमार गोरे यांची कोंडी करण्यामध्ये मग्न होते. तोच एका युट्युबरवर पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्या महिलेला पैसे घेताना सातारा पोलिसांनी पकडले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यात शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्याचा प्रयत्न झाला.

तसेच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना समन्स पाठवले त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे यांना ही समन्स पाठवले. अशा टप्यावर हे प्रकरण असताना आता या प्रकरणाने नवीन मोड घेतला असून रामराजे आणि त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले आहे. त्यामुळे हे फोन रेकॉर्ड कोणी केले? कोणी व्हायरल केले? त्यावरून रामराजे यांच्यावर काय कारवाई होणार याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

Advertisement
Tags :
_satara_news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaramraje nimbalkarSatara Political NewsViral call Record
Next Article