महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामकुमार, सिद्धार्थ पहिल्याच फेरीत पराभूत

06:33 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथे सुरू असलेल्या दिल्ली ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील भारताचे आव्हान रामकुमार रामनाथन व सिद्धार्थ विश्वकर्मा यांच्या पहिल्याच फेरीतील पराभवानंतर संपुष्टात आले.

Advertisement

रामकुमारला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला होता. त्याला ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेटकडून 3-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. या दोघांत झालेली ही पहिलीच लढत होती. पहिल्या फेरीच्या अन्य एका सामन्यात माजी राष्ट्रीय चॅम्पियन सिद्धार्थ विश्वकर्माला पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या सॅम्युअल व्हिन्सेन्ट रुगेरीकडून 4-6, 2-6 अशी हार पत्करावी लागली.

करण सिंग व शशीकुमार मुकुंद या अन्य दोन वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या भारतीयांनाही पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे एकेरीत आता एकही भारतीय खेळाडू उरला नाही. दुहेरीत रामकुमार व साकेत मायनेनी भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. त्यांना अग्रमानांकन मिळाले असून त्यांची सलामीची लढत जर्मनीच्या जेकब श्नायटर व मार्क वॉलनर यांच्याशी होणार आहे. मात्र पार्थ अगरवाल व सिद्धार्थ रावत यांचे आव्हान चौथ्या मानांकित जपानच्या मात्सुई तोशिहिदे व कायतो यूसुगी यांनी 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले. दुहेरीत भारताच्या आणखी तीन जोड्यांनी भाग घेतला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article