महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामेश्वरम कॅफे स्फोटाचे पाकिस्तानशी धागेदोरे

06:33 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयएच्या आरोपपत्रातून धक्कादायक बाब उघड

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बेंगळूरमधील व्हाईट फिल्डच्या ब्रुकफिल्डच्या येथील रामेश्वरम कॅफेतील स्फोटप्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या स्फोट प्रकरणाचा पाकिस्तानशी लिंक असल्याची धक्कादायक बाब एनआयच्या तपासातून उघडकीस आली आहे. रामेश्वरम कॅफेतील स्फोट प्रकरणाचे पाकिस्तानशी धागेदोरे असल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी फैजल याने हा स्फोट घडविण्यासाठी पाकिस्तानातूनच हालचाली केल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. मंगळूरमधील कुकर बॉम्ब स्फोटानंतर अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब बेपत्ता झाले होते. काही दिवसानंतर ते बेंगळूरला परतले होते. तेव्हा मुजम्मील शरीफसोबत त्यांची ओळख झाली होती. मुजम्मील हा बेंगळूरच्या मॅजेस्टीक जवळील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. याच मुजम्मील शरीफचे अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोघांनी मनपरिवर्तन केले होते. पहिल्या टप्प्यात काही घातपाती कारवाया करण्यासाठी या दोघांनी मुजम्मीलला टास्क दिला होता.

भाजप कार्यालय उडविण्याचा प्लान फ्लॉप

दहशतवाद्यांनी डिसेंबर 2023 मध्ये बेंगळूरमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता. ऑनलाईन हॅन्डलरच्या सहाय्याने त्यांना ही सूचना प्राप्त झाली होती. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन आहे. त्याच दिवशी बेंगळूरमध्ये स्फोट घडवा अशी सूचना होती. त्यानुसार मल्लेश्वरम येथील भाजपच्या कार्यालयाला लक्ष बनविण्याची योजना शाजीबने आखली होती. त्यासाठी त्याने बेंगळूरहून चेन्नईला आपली जागा हलविली. ट्रिप्लीकेन येथे भाडोत्री घर घेऊन तेथेच आयईडी बॉम्ब तयार केला. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी हा बॉम्ब घेऊन शाजीब बेंगळुरात दाखल झाला. या दिवशी भाजप कार्यालयसमोर बॉम्ब ठेवण्याची तयारी त्याने केली. परंतु भाजप कार्यालयासमोर कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था असल्याने भाजप कार्यालयाच्या मागील बाजूला बॉम्ब ठेऊन स्फोटासाठी 90 मिनिटांचा टायमर सेट केला. परंतु बॉम्बचा स्फोट झाला नाही. बॉम्ब ठेवल्यानंतर त्यांने चेन्नईला पोबारा केला होता. मात्र, हा बॉम्ब कुणाच्या हाती लागला नाही. याविषयी कोणतीही माहिती हाती लागली नाही.

...अखेर रामेश्वरम कॅफे टार्गेट

मलेश्वरमधील भाजप कार्यालयाच्या मागील बाजूस ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट न झाल्याने पुन्हा लोकांची अधिक वर्दळ असलेल्या भागात स्फोट घडविण्याचा कट रचण्यात आला. अखेर फेब्रुवारी महिन्यात आयईडी बॉम्ब तयार करून 29 फेब्रुवारी रोजी शाजीब चेन्नईहून बेंगळूरला आला. कुंदलहळ्ळीजवळ आल्यानंतर त्याने रामेश्वर कॅफेत बॉम्ब ठेऊन स्फोट घडविला होता. त्याआधी व्हाईटफिल्ड परिसरातील आयटी कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये स्फोट घडविण्यासाठी रेकी करण्यात आली. तथापि, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे रामेश्वरम कॅफेला टार्गेट करण्यात आले होते, असा उल्लेखही एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article