महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रमेश तवडकर यांना मंत्रिपदाची शक्यता ?

12:33 PM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काणकोण : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल होण्याची आणि त्यात काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांना महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वत: तवडकर यानी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी तशी शक्यता व्यक्त केली. यामुळे खळबळ उडाली असून मंत्रिमंडळात बदल होणार असल्याच्या चर्चेला आणखी ऊत आला आहे. यापूर्वी देखील एक-दोनदा आपल्याला संधी देण्याचा विचार पुढे आला होता. मात्र आपण ज्या ठिकाणी आहोत त्या जागी समाधानी असल्याचे आपण पक्ष नेतृत्वाला सांगितले होते. यावेळी मात्र तशी संधी दिल्यास कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आपण ती स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article