महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांचा उबाठात प्रवेश

03:48 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आज प्रवेश केला . श्री हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुका शिवसेना संघटक पदाची जबाबदारी दिलेली असताना कविलकट्टा येथे झालेल्या निलेश राणे यांच्या उपस्थितीत जो प्रवेश झाला त्या प्रवेशाने नाराज झाले होते या शिवाय आमदार वैभव नाईक यांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याची पध्दत ही शिंदे शिवसेना पक्षात नाही तसेच आमदार वैभव नाईक हेच या भागाचे आमदार आवश्यक आहेत असे सर्व सामान्य मतदारांचे मत असुन आपण आम नाईक यांच्या नेतृत्वाखाली या पुढे जोमाने कारणार असल्याची भावना श्री हरमलकर यांनी व्यक्त केली यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी त्यांचे मन वळवुन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची विनवणी केल्यानुसार आज प्रवेश झाला . यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतिश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट,, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, सचिन काळप,राजु गवंडे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महेश वेळकर, संतोष पाटील, संदेश प्रभु,आदी उपस्थित होते.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article