For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामायण मालिकेतील कलाकार अयोध्येत

06:22 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामायण मालिकेतील कलाकार अयोध्येत
Advertisement

वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisement

तीन दशकांपूर्वी गाजलेल्या ‘रामायण’ या दूरदर्शनवरील मालिकेतील अनेक कलाकार भगवान रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत आलेले असून त्यांच्याही मनात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंबंधी अपार उत्सुकता आहे. या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या दिपीका चिखलिया, रामाची भूमिका साकारलेले कलाकार अरुण गोविल, तसेच इतरही कलाकार अयोध्येत आले असून ते 22 जानेवारीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत अयोध्येत राहणार आहेत.

भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा आमच्या दृष्टीने ऐतिहासिक कार्यक्रम आहे. भगवान राम हे सर्व भारतीयांचे आराध्य दैवत असून त्यांचे भव्य मंदिर रामजन्मभूमीच्या स्थानी साकारणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तीन दशकांपूर्वी रामायण या मालिकेमुळे आम्हाला मोठी प्रसिद्धी मिळाली. अभिनय क्षेत्रात नवोदितांना या मालिकेमुळे पुढे भविष्य घडविता आले. ही आम्ही प्रभू रामचंद्रांची कृपाच समजतो, अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी व्यक्त केली.

Advertisement

90 च्या दशकात अतिलोकप्रिय

रामानंद सागर निर्मिती रामायण ही मालिका 90 दशकात प्रचंड गाजली होती. दर रविवारी या मालिकेचा 1 तासाचा एक भाग प्रसारित केला जात असे. या एक तासाच्या कालावधीत देशात सर्वत्र संचारबंदी लागू केल्याप्रमाणे बाहेर शुकशुकाट असे असा अनुभव आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या मालिकेचे पुनर्प्रसारण कोरोना उद्रेकाच्या काळात करण्यात आलेले होते. तेही असंख्य भारतीयांनी पाहिले होते. आता अयोध्येत भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नजीक आलेला असताना अनेकांना या रामायण मालिकेची आठवण होत आहे.

Advertisement
Tags :

.