For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनमधील प्रो-लीग हॉकी स्पर्धेत कोल्हापूरच्या रमा पोतनीस पंच

05:27 PM Dec 01, 2024 IST | Radhika Patil
चीनमधील प्रो लीग हॉकी स्पर्धेत कोल्हापूरच्या रमा पोतनीस पंच
Rama Potnis from Kolhapur to umpire in Pro League Hockey Tournament in China
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

इंटरनॅशनल हॉकी फेरडेशनच्या (एचआयएफ) वतीने चीनमध्ये शनिवार 30 रोजीपासून प्रो-लीग हॉकी स्पर्धेला सुऊवात करण्यात आली आहे. पाच डिसेंबरपर्यंत सुऊ राहणाऱ्या या स्पर्धेसाठी फेडरेशनच्या पॅनेलवर असलेल्या कोल्हापूरच्या रमा पोतनीस यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. पोतनीस हा नुकत्याच चीनला रवाना ही झाल्या आहेत. प्रो-लीग हॉकी स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी निवड झालेल्या रमा ह्या भारतातील एकमेव महिला पंच ठरल्या आहेत. स्पर्धेत भारत, चीन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, अर्जेंटिना, बेल्जियम, जर्मनी व हॉलंड या देशांचे संघ प्रतिनिधीत्व करत आहेत. दरम्यान, रमा यांनी आजवर विविध देशात झालेल्या अनेक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये भारतातर्फे पंचगिरी केलेली आहे. तसेच पंचगिरीत उकृष्ट कामगिरी करत रमा यांनी इंटरनॅशनल हाय पोटेन्शियल पंच पॅनेलमध्ये स्थान मिळवले आहे. या पॅनेलमधूनही प्रो-लीग हॉकी स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी निवडल्या गेलेल्या रमा ह्या पहिल्या भारतीय महिला पंच ठरल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.