विधान परिषदेचे सभापती पद मिळताच राम शिंदे 'श्रीअंबाबाई'च्या दर्शनाला
कोल्हापूर
विधान परिषदेचे सभापती म्हणून नियुक्ती झाल्यावर राम शिंदे यांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी मी देवीला बोललो होतो की, मी निवडून आल्यावर दर्शनाला येईन. पण निवडणूकीत अल्पशा मताने माझा पराभव झाला. तरीही माझी निवड विधान परिषदेच्या सभापती पदी झाल्याने आज मी इथे दर्शनाला आलो आहे. विधानसभा २०२४ ला वातावरण चांगलं होतं. पण काही सहकाऱ्यांनी दगाफटका केला. नुरा कुस्तीचा मी बळी ठरलो पराभव झाला. मात्र भविष्यात या पराभवाची गांभीर्यपूर्वक दखल घेणार आहे.
एका गावच्या सरपंचाचा अशा पद्धतीने मृत्यू होणं हे दुर्दैवी बाब आहे. सरकारच्यावतीने गांभीर्याने दखल घेतलेली आहेत. आरोपीना अटक झालेली आहे. तपासासाठी गांभीर्याने पाऊल उचललेली आहे. दोषींवरती कडक कारवाई झाली पाहीजे, असेही शिंदे यांनी सांगितले.