For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेचा राम निवास चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

09:54 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेचा राम निवास चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
Advertisement

मनीष पाटील उपविजेता, मॅरीडोना दुसरा उपविजेता : रेल्वेला वैयक्तिक विजेतेपद, महिला विभागात- हर्षता पवार, इनगुदम कविना चानू विजेते, मणिपूर विजेता

Advertisement

बेळगाव : पंजाब लुधियाना येथे आयबीबीएस इंडिया व पंजाब शरीर सौष्ठव संघटना यांच्या आयुक्त विद्यमाने 15 व्या मि. इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव  स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशनच्या राम निवासने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला. महाराष्ट्राच्या महेश पाटीलने पहिले  उपविजेते, मणिपूरच्या मॅराडोना केस्तीने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटात महाराष्ट्राची हर्षदा पवार व इंगुजम कविता चानू विजेतेपद. सांघिक स्पर्धेत रेल्वेने 425 गुणासह वैयक्तिक विजेतेपद, 310 गुणांसह महाराष्ट्र पहिले पद, 85 गुणासह मणिपूर दुसरेविजेतेपद मिळविले. महिलांच्या गटात मनिपुरने 75 गुणांसह विजेतेपद, 70 गुणाचे महाराष्ट्र उपविजेतेपद तर 25 गुणांसह आसाम व मध्य प्रदेश यांनी दुसरे उपविजेतेपद पटकाविले. पंजाब येथील लुधुनिया  येथेझालेल्या 15 व्या मि. इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आयबीबीएस मुंबईच्या मान्यतेनुसार 10 वजनी गटात स्पर्धा घेण्यात आली.

निकाल पुढीलप्रमाणे-

Advertisement

  • 55 किलो वजनी गट : 1) के बाल कृष्णा (रेल्व़े) 2) कुंदनकुमार गोपी (झारखंड) 3) दीपेश बोहीर (महाराष्ट्ऱ) 4) कृष्णा राधेकृष्णा (तमिळनाडू,) 5) सुभाष इसशूर (प. बंगाल)
  • 60 किलो गट: 1) नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), 2) एल. निता सिंग (मणिपूर), 3)  जगदीश दाते (महाराष्ट्र), 4) वासू (रेल्वे), 5) भूपेंद्र सिंग (पंजाब).
  • 65 किलो गट: 1)विघ्नेश (रेल्वे), 2) धीरज कुमार (कर्नाटक), 3) परीक्षित हजारीका (आसाम), 4) अशोक बेहेरा (छत्तीसगड) 5) योगेश निकम (महाराष्ट्र),
  • 70 किलो वजनी गट: 1) पंचाक्षरी लोणार (महाराष्ट्र), 2) प्रतिक पांचाळ (रेल्वे), 3) अमितकुमार भुयान (ओडिसा), 4) राजू खान (बिहार), 5) साहेब कुमार (दिल्ली),
  • 75 किलो वजनी गट: 1)के. हरि बाबू (रेल्वे), 2) संतोष गणेश शुक्ला (महाराष्ट्र), 3) नमी मारीनिदू (आंध्र प्रदेश), 4) हॅपी (पंजाब), 5) बिलाल राव (सेंट्रल रेवणी स्पोर्ट्स)
  • 80 किलो वजनी गट: 1) व्ही जयप्रकाश (रेल्वे), 2) अश्विन शेट्टी (रेल्वे), 3) प्रकाश प्रधान (आसाम), 4) सनीत टी.एस. (सर्विसेस), 5) प्रदीप टी. (केरळ),
  • 85 किलो वजनी गट: 1)महेश पाटील (महाराष्ट्र), 2) एन. सरबो सिंग (रेल्वेज), 3) विघ्नेश जी. (सर्विसेस), 4) अजिंक्य रेडेकर (महाराष्ट्र), 5) विनोद कुमार (तमिळनाडू),
  • 90 किलो वजनी गट: 1)मॅराडोना केस्ती (मणिपूर), 2) अशितोश शहा (इंडिया पोस्ट), 3) अश्फाक महंमद (रेल्वेज), 4) नीलकंठ घोष (प.बंगाल), 5) जयकुमार (तामिळनाडू),
  • 90 ते 100 किलो वजनी गट: 1) राम निवास (रेल्वे), 2) अनुज कुमार तालियान (उत्तर प्रदेश), 3) मुरली कुमार आर. (सर्विसेस), 4)  सानिदया भिस्त (उत्तराखंड), 5) प्रशांत कुमार सिंग (झारखंड),
  • 100 किलो वजनी वरील गट: 1)निलेश दागाडे (महाराष्ट्र), 2) सुखदेव सिंग (पंजाब), 3) एम. राजकुमार (रेल्वेज), 4) जावेदअली खान (रेल्वे), 5) मनोज अग्निहोत्री (उत्तर प्रदेश) यांनी आपापल्या गटात विजेतेपद फटकाविले. मि. इंडिया मानांच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबासाठी बाल कृष्णा, नितीन म्हात्रे, विघ्नेश, पंचाक्षरी लोणार, जयप्रकाश, के. हरीबाबू, महेश पाटील, मॅराडोना, राम निवास, निलेश दागाडे यांच्यात लढत झाली त्यामध्ये रामनिवास, महेश पाटील व मॅराडोना  केस्ती यांच्या तुलनात्मक लढत झाली त्यामध्ये रेल्वेच्या राम निवासने मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकाविला. महाराष्ट्राच्या महेश पाटीलने पहिले उपविजेतेपद, मणिपूरच्या मॅराडोना  केस्तीने दुसरे उपविजेतेपद पटकाविले.
  • महिलांच्या गटात: 55 किलो वजनी गटात: 1) हर्षदा संतोष पवार (महाराष्ट्र,), 2) सबिता बाणी (आसाम), 3) संगीता तोक्षम (मणिपूर), 4) किमी कुमल बिरडे (महाराष्ट्र), 5) साराबती मुजुमदार  (प. बंगाल).
  • 55 किलो वरील गटात: 1) इनगुदम कविता चानू (मनिपूर), 2) वंदना ठाकूर (मध्य प्रदेश), 3) बबीता (पंजाब), 4) प्रतिभा तापलीयाल (उत्तराखंड), 5) अंजू मितवा (केरळ) यांनी महिला गटात विजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे  वर्ल्ड बॉडी बिल्डिंग  फेडरेशन सेक्रेटरी चेतन पठारे,  इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन अध्यक्ष टी. व्ही. पॉली,  इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन जनरल सेक्रेटरी हिरल शेठ, पद्मश्री आणि अर्जुन अवॉर्ल्ड विजेते  प्रेमचंद डीग्रा, अॅड. रमेश स्वामी, मोनू सब्रवाल, आरसू तमिळनाडू, भास्कर,  आशियाई पंच अजित सिद्धणणवर, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Advertisement
Tags :

.