लोकमान्य श्रीराम मंदिर येथे रामनवमी उत्साहात

बेळगाव : लोकमान्य श्रीराम मंदिर येथे रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुढीपाडव्यापासून दररोज सकाळी 8.30 वाजता चिदंबर भटजी यांच्या पौरोहित्याखाली लोकमान्य सोसायटीचे संचालक सुबोध गावडे, पंढरी परब व आरती परब, डॉ. दामोदर वागळे, गजानन धामणेकर, गायत्री काकतकर, सीएफओ वीरसिंग भोसले, सीईओ अभिजित दीक्षित, मॅनेजर शिल्पराज कलागते यांच्या हस्ते नित्य अभिषेक व पूजन करण्यात आले. रामनवमी दिवशी दुपारी कविता मोदगेकर यांनी रामाचा पाळणा सादर केला. यावेळी शामल दीक्षित, सारिका गावडे, संध्या कालकुंद्रीकर, कस्तुरी बडीगेर, आशाताई गिनगिने आदी उपस्थित होते. याप्रसंगी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते शंकरराव बांदकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी टाळ आणि मृदंगाच्या साथीने उत्कृष्ट असे कीर्तन सादर केले. सायंकाळी मधुरा शिरोडकर यांनी श्रीराम यांच्यावर प्रवचन केले. रामनवमीनिमित्त मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंटप घालून फुलांची सजावट करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कालकुंद्रीकर, तानाजी पाटील, सतीश गोडसे,राजू दळवी व लोकमान्यच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.