मिस्त्री मध्ये राम कपूर अन् मोना सिंह
थ्रिलर वेबसीरिजचा ट्रेलर सादर
राम कपूर आणि मोना सिंह यांची रहस्य, रोमांच आणि विनोदी धाटणीची वेबसीरिज ‘मिस्त्राr’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. ही एक थ्रिलर सीरिज असून यात रहस्य अन् हेराच्या चतुरपणासह कॉमेडी देखील पेरण्यात आली आहे. निर्मात्यांनी ट्रेलरसोबत याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
राम कपूर या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. तो यात खासगी हेराच्या भूमिकेत आहे. तर मोना सिंह पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. राम कपूरच्या व्यक्तिरेखेचे नाव यात अरमान मिस्त्राr आहे. मिस्त्राr ही प्रत्यक्षात लोकप्रिय अमेरिकन सीरिज ‘मॉन्क’चे भारतीय रुपांतरण आहे. ऋषभ सेठने मिस्त्राr सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर बनिजेय एशियाने युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्टुडिओजसोबत मिळून याची निर्मिती केली आहे.
वेबसीरिजमध्ये राम कपूर, मोना सिंहसोबत शिखा तलसानिया, क्षितीज दाते देखील आहे. ही सीरिज 27 जून रोजी जियोहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. राम कपूर आणि मोना सिंहने या सीरिजला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.