महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राम ज्योती महोत्सवाचे गोव्यात आयोजन

12:17 PM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्य सरकारतर्फे पर्यटन खात्याच्यावतीने 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील  श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राम ज्योती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पर्यटन खाते लवकरच व्यवस्थापन कंपनीची नेमणूक करणार आहे. पर्वरी व पणजी या भागात विविध ठिकाणी रोषणाई केली जाणार आहे. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्ताने गोव्यातील जनता उत्साहित झाली असून लोकांमध्ये त्याचा प्रभाव वाढत आहे. म्हणून पर्यटन खात्याने लोकांचा उत्साह अधिक द्विगुणीत करण्यासाठी पर्वरी ते पणजी दरम्यान विशेष रोषणाई व इतर गोष्टी करण्याचे ठरविले आहे. पर्वरी ते पणजी हा मार्ग त्यानिमित्त सुशोभित करण्यात येणार असून ऐतिहासिक राम मंदिराचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यासाठी लोकांना पाचारण करण्याचा पर्यटन खात्याचा इरादा आहे. सुकूर पर्वरी ते पणजी या दरम्यान रामाचे धनुष्यबाणाचे कटआऊट उभारण्यात येणार असून विविध रंगीत पताका सजावटीने तो मार्ग सजवला जाणार आहे. भक्तीमय वातावरण निर्माण करावे म्हणून हे सर्व करण्यात येणार असून स्थानिक जनता, प्रवासी, पर्यटकांना देखील या राम ज्योती महोत्सवाचा आनंद घेता येईल, अशी माहिती पर्यटन खाते सूत्रांनी दिली. ठराविक जागांवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असून ‘जय श्रीराम’ असा आशीर्वाद लोकांना मिळणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article