For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !

12:42 PM Apr 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात
Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement

सावंतवाडी

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत . याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जिल्हधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे . ''अबकी बार ४०० पार'' ... मोदी सरकार'' अशा घोषणांनी रत्नागिरी शहर दणाणून गेले आहे . केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत , शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर , सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत .

Advertisement

Advertisement
Tags :

.