मालवणमध्ये शुक्रवारी राहुलच्या सन्मानार्थ गौरव रॅली
मालवण/प्रतिनिधी
कृ .सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित, स . का. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या , एनसीसी विभागाचा सीनियर अंडर ऑफिसर राहुल उषा उदय चव्हाण याला 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय संचालनामध्ये आणि फ्लॅग एरियामध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला . तसेच फ्लॅग एरियामध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला तिसऱ्या स्थानावर रँकिंग प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि मालवण तालुक्यासाठी खासकरून मालवणवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. राहुल चव्हाण याचा डायरेक्टर जनरल NCC, महाराष्ट्राचे राज्यपाल, 56 महाराष्ट्र बटालियन या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. मालवणवासियांसाठी आरडीसी परेड मध्ये सहभागी होण्याचा हा सन्मान इतिहासामध्ये प्रथमच प्राप्त झालेला आहे. गेल्या सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर राहुलचे प्रथमच दिल्लीहून मालवणमध्ये आगमन होत आहे, तरी या निमित्ताने उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी राहुलच्या सन्मानार्थ गौरव रॅली आयोजित करण्यात आलेली आहे ही गौरव रॅली उद्या 7 तारखेला सकाळी ठीक 08 वाजता कुंभारमाठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून सुरु होईल .त्यानंतर देऊळवाडा, भरड नाका, बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ, कन्या शाळा मार्गे स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये समाप्त होईल.महाविद्यालयात पोहोचल्यानंतर कॉलेजच्या सभागृहामध्ये कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते तसेच मालवण मधील विविध सामाजिक संस्था, विविध पदाधिकारी व मान्यवर यांच्या हस्ते एनसीसी सिनिअर अंडर ऑफिसर राहुल चव्हाण याचा सत्कार समारंभ होईल.तरी राहुल गौरव रॅलीत तमाम मालवणवासीयांनी टू व्हीलर, फोर व्हीलर,रिक्षा, सायकली घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच राहुलच्या सत्कार समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन एन सी सी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ .एम .आर .खोत,प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर , कृ. सी .देसाई शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर सेक्रेटरी गणेश कुशे ,
ॲड. समीर गवाणकर, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती,
सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले आहे.