महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नीलेश राणेंच्या प्रचारार्थ आचऱ्यात रॅली

01:00 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी आचरा बाजारपेठेत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आचरा येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आचरा बाजारपेठ येथून रॅलीला प्रारंभ झाला. तेथून आचरातिठा रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान बाजारपेठेतील व्यापारी, विक्रेते, नागरिक यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. युतीचे उमेदवार नीलेश राणे हे नेहमीच मदतीला वेळोवेळी धावून जाणारे नेतृत्व असून आचरा विभागातील विविध विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. या भागातून राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन रॅलीमधील उपस्थितांनी केले. यावेळी उपस्थित मतदारांनीही नीलेश राणे यांच्या पाठिशीच राहणार असल्याचे सांगितले.

Advertisement

रॅलीमध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बाळा चिंदरकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर उपसरपंच संतोष मिराशी, त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे, मंगेश गांवकर राजन गावकर, संतोष कोदे, संतोष गावकर, अवधूत हळदणकर, पांडुरंग वायंगणकर, अभिजित सावंत, जयप्रकाश परूळेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर,चंदू कदम, समीर बावकर, बबलू गावकर, सचिन हडकर, बाबू कदम, अभय भोसले, गुरु कांबळी, चंदू गोलतकर उदय घाडी, रुपेश हडकर, उमेश सावंत, अमर पळसंबकर आदी उपस्थित होते. हर्षिता पुजारे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan update # news update
Next Article