रेस 4 चित्रपटात रकुल प्रीत
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत अलिकडेच मेरे हसबंड की बीवी या चित्रपटात दिसून आली आहे. अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट अपयशी ठरला आहे. परंतु या चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि रकुलच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. रकुलला आता एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. रकुल या चित्रपटात एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत दिसून येणार आहे. रमेश तौरानी यांनी रेस प्रेंचाइजीच्या चौथ्या भागाची घोषणा केली आहे. सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात रकुल मुख्य नायिका असणार आहे. रकुलने या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शविला आहे.
सैफ अली खान आणि रमेश तौरानी हे सध्या या प्रोजेक्टवर काम करत आहेत. याच्या कहाणीला अंतिम स्वरुप देण्यात आल्यावर उर्वरित कलाकारांची निवड करण्याचे काम सध्या सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रकुल आणि सैफ हे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार असल्याचे समजते.