महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यसभा खासदारांनीही ‘लोकसभा’ लढवावी! मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचा संदेश

06:55 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 : मंत्र्यांना विचारपूर्वक बोलण्याचाही सल्ला, नव्या ‘व्हिजन’वर विचारमंथन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानी दिल्लीतील चाणक्मयपुरी भागात असलेल्या सुषमा स्वराज भवनात आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधाने टाळा आणि विचारपूर्वक बोला, असा सल्ला दिला. तसेच मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या राज्यसभेच्या खासदारांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची सूचनाही पंतप्रधान मोदींनी बैठकीत केली. याप्रसंगी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ‘विकसित भारत : 2047’च्या व्हिजनवर चर्चा केली. तसेच पुढील पाच वर्षांतील योजनांवर विचारमंथन केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती. या एकदिवसीय बैठकीदरम्यान मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ उचलल्या जाणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यसूचीवर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थितांना पंतप्रधानांनी मार्गदर्शन करताना ‘एआय’पासून सावध राहण्यास सांगितले. तुम्हाला बोलायचेच असेल तर सरकारी योजनांवर बोला आणि वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश प्राप्त करून देण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी सध्या राज्यसभेमध्ये असलेल्या सदस्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून पक्षाला बळ मिळवून द्यायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. नुकत्याच भाजपने जाहीर केलेल्या 195 लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या 7 जणांची नावे समाविष्ट आहेत. या सात जण मोदी सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळत आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील गुना येथील ज्योतिरादित्य सिंधिया, गुजरातमधील पोरबंदरमधून मनसुख मांडविया, राजस्थानमधील अलवरमधून भूपेंद्र यादव, केरळमधील तिऊवनंतपुरममधून राजीव चंद्रशेखर, आसाममधील दिब्रुगढमधून सर्बानंद सोनोवाल, गुजरातमधील राजकोटमधून परसोत्तमाई ऊपाला आणि केरळमधील अटिंगल मतदारसंघातून व्ही मुरलीधरन आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याप्रमाणेच आता अन्य खासदारांनीही लोकसभा लढण्यासाठी पुढे यावे असा पुनरुच्चार मोदींनी केला. यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातही त्यांनी असेच वक्तव्य केले होते.

भविष्यातील वाटचालीवर चर्चा

‘लोकसभा निवडणूक 2024’चे बिगुल वाजण्यापूर्वी मोदी सरकारने आगामी दिवसांचा रोडमॅप तयार करण्यास सुऊवात केली आहे. त्याच अनुषंगाने रविवारी मंत्रिमंडळ बैठक आमंत्रित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक मंत्रालयांच्या भविष्यातील अजेंडा आणि पुढील 5 वर्षांच्या अनेक तपशीलवार योजनांवर चर्चा करण्यात आली. मंत्रिपरिषदेने विकसित भारत 2047 साठी व्हिजन डॉक्मयुमेंट तसेच नवीन सरकारच्या स्थापनेनंतर त्वरीत अंमलबजावणीसाठी 100 दिवसांच्या कार्यसूचीवरही चर्चा केली. सरकारच्या मते, विकसित भारताचा रोडमॅप हा 2 वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यात सर्व मंत्रालये, राज्य सरकारे, शिक्षणतज्ञ, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक संस्था आणि तऊणांचा समग्र दृष्टिकोन समाविष्ट आहे.

रोडमॅपवर चर्चा

‘विकसित भारत’ या रोडमॅप अंतर्गत विविध स्तरांवर 2,700 हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात 20 लाखांहून अधिक तऊणांकडून सूचना प्राप्त झाल्या. विकसित भारताचा रोडमॅप ही स्पष्टपणे व्यक्त केलेली राष्ट्रीय दृष्टी, आकांक्षा, उद्दिष्टे आणि त्यांच्या कृती बिंदूंची एक व्यापक रूपरेषा आहे. आर्थिक वाढ, राहणीमान सुलभता, व्यवसाय विकास, पायाभूत सुविधा, समाजकल्याण इत्यादी क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. धोरण आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान वेळोवेळी मंत्री परिषदेच्या बैठका घेत असले तरी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारची बैठक महत्त्वाची होती.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article