For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभा निवडणूक नामांकन प्रक्रिया पूर्ण

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभा निवडणूक नामांकन प्रक्रिया पूर्ण
Advertisement

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी : बहुतांश खासदार बिनविरोध होण्याची शक्यता : उत्तर प्रदेश, कर्नाटकात चुरस रंगणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुऊवार, 15 फेब्रुवारी रोजी संपली. भाजपचे अध्यक्ष जे. पी. न•ा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह बहुतांश उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्मयता आहे. तथापि, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाच्या शक्मयतेशिवाय प्रत्येकी एक-एक अतिरिक्त उमेदवार (संख्यात्मक संख्याबळाच्या दृष्टीने) रिंगणात उतरवल्यामुळे या राज्यांतील लढत रंजक बनली आहे. राज्यसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र, बिहारमधील 6, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशातील 5, गुजरात, कर्नाटकमधील 4, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, ओडिशामधील प्रत्येकी 3 जागांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक जागा समाविष्ट आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी आहे. आवश्यकता भासल्यास 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतमोजणी होईल.

Advertisement

उत्तर प्रदेशात चुरस

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, माजी खासदार चौधरी तेजवीर सिंग, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी राज्यमंत्री संगीता बळवंत अशा दिग्गजांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या 403 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 252, सपाकडे 108 आणि काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. भाजपचा मित्रपक्ष अपना दलाचे (सोनेलाल) सभागृहात 13 सदस्य आहेत तर निषाद पक्षाचे सहा सदस्य आहेत. आरएलडीचे नऊ, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे सहा, जनसत्ता दल लोकतांत्रिकचे दोन आणि बसपाचा एक सदस्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी 37 मतांची गरज आहे. सध्या 403 सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 399 सदस्य आहेत.

हिमाचल प्रदेशात कडवी स्पर्धा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सागरिका घोष, सुष्मिता देव, मोहम्मद नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने समिक भट्टाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांनी उमेदवारी दाखल केली. हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आता थेट लढत होण्याची शक्मयता आहे. भाजपने सिंघवी यांच्याविरोधात काँग्रेस सरकारचे माजी मंत्री हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Tags :

.