For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजनाथ सिंह यांना एम्समधून डिस्चार्ज

06:28 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजनाथ सिंह यांना एम्समधून डिस्चार्ज
Advertisement

पाठदुखीमुळे दोन दिवसांपासून उपचार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना शनिवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पाठदुखीच्या तक्रारीमुळे त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सच्या मीडिया सेलच्या प्रभारी डॉ. रीमा दादा यांनी शनिवारी त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती जारी केली. गेल्या दोन दिवसांपासून राजनाथ सिंह यांची पाठदुखीसंबंधी तपासणी करून उपचार करण्यात आले. आता शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असे त्यांनी सांगितले. सिंह यांना 11 जुलै रोजी न्यूरोसर्जरी विभागाच्या जुन्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.