आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत राजेश लोहार उत्तीर्ण
बेळगाव : थायलंड येथील पटाया येथे झालेल्या वर्ल्ड बॉडिबिल्डींग स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये बेळगावच्या राजेश लोहार हे उत्तीर्ण झाले आहेत. पटाया येथे झालेल्या विश्व शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा घेण्यात आली. जवळपास या परीक्षेत संपूर्ण जगातून 76 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव बॉडी बिल्डिंग व स्पोर्ट्स संघटनेचे सचिव राजेश लोहार हे उत्तीर्ण झाले आहेत. वर्ल्ड बॉडी बिल्डिंगचे उपाध्यक्ष सुनील लोयब, प्रिन्स सिंग, बारवेश यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत उत्तीर्ण झाल्याबद्दल कर्नाटक बॉडीबिल्डींग व स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर त्याचप्रमाणे बेळगाव बॉडीबिल्डींग आणि स्पोर्ट्सचे पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले. राजेशला अनिल आंबरोळे, नारायण चौगुले, महेश सातपुते, जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले.