मालोजीराजे छत्रपतींच्या हस्ते राजेश लाटकर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ
कोल्हापूर:
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या शिवाजी पेठेतील प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अर्धा शिवाजी पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात झाली. प्रेशर कुकर या चिन्हाच्या प्रतिकृती घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. येत्या वीस तारखेला राजेश लाटकर यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजेश लाटकर म्हणाले कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास घडविण्याबरोबरच पेठापेठातील नियोजनबद्ध कामे करण्यासाठी माझ्यासारख्या महापालिकेत काम केलेल्या कार्यकर्त्याला तुमचे मतदान रूपी बहुमत द्या आणि मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. माझे चिन्ह प्रेशर कुकर असून कोल्हापूरच्या जनतेने मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या विकासाचे व्हिजन असणारा जाहीरनामा सादर केला आहे. भविष्याचा वेध घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये महिलांना दरमहा तीन हजार रुपये, पदवीधरांना चार हजार रुपये मानधन, उद्योगांना कर्ज पुरवठा, गरीब, मध्यम आणि उच्च वर्गीय अशा समाजातील सर्वच घटकांचा उत्कर्ष साधणारा व्हिजन समोर ठेवून हा जाहीरनामा तयार केला आहे. रोजगार, महिला सुरक्षा, महागाई आणि शेतक्रयांचे प्रश्न याबाबत विचार करुन महाविकास आघाडीने धोरणे अखली असून येण्राया काळात महाविकास आघाडीचे सरकार आणून महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवूया असे सचिन चव्हाण म्हणाले.
यावेळी इंद्रजित बोंद्रे, विक्रम जरग, हर्षल सुर्वे, राजेंद्र जाधव, संदीप देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी पेठेच्या विविध गल्लीतून रॅली फिरत नाथागोळे तालीम येथे शेवट झाला.