राजेश क्षीरसागर यांचे सतेज पाटलांवर गंभीर आरोप
कोल्हापूर :
कोल्हापूर विधानसभा उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेद्वार राजेश क्षीरसागर यांनी माझ्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत केला आहे.
मी नागरिकांना भेटायला, त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी म्हणून मी टाकाळा भागात गेलो असताना, काही तरूण माझे व्हीडीओ शुटींग करत होते. त्यांना मी माझं व्हीडीओ शुटींग का करताय अशी विचारणा केली असता, ते वीस पंचवीस गुंड माझ्या अंगावर धावून आले. त्यांच्या हातात दांडके होते. माझ्या अंगरक्षकाने कसेबसे मला वाचवले, असे क्षीरसागर यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, कसबा बावडा परिसरातील एका मतदान केंद्राला भेट द्यायला गेलेलो असता, त्यावेळी बावड्यातील मिसळ घ्यायला बसले असताना आमचे कार्यकर्ते सुनील जाधव त्यांना बाहेर द्या असे सांगण्यात आले. म्हणजे लोकांचा कौल महायुतीच्या बाजुने आहे आणि निवडणूक त्यांच्या हातातून गेली आहे असे कळाल्यावर, यांनी आधीच प्लॅन करून हा राडा करण्याचा प्रयत्न केला. पण मी , नाना कदम आम्ही सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांना आटोक्यात आणून ही घटना थोपवली.
हिशोब चुकता केला जाईल अशी धमकी आमदार सतेज पाटील यांनी दिली यावर माझा आक्षेप आहे असे ही राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले. आचारसंहितेमध्ये संचारबंदी असताना शिवाजी चौकमध्ये कार्यकर्ते गोळा करून भाषण करून लोकांच्या भावना भडकवता, या सगळ्याविषयी आम्ही तक्रार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.