राजेश क्षीरसागर यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूरः
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेद्वार राजेश क्षीरसागर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनीही मतदान केले.
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, मतदारांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे. संपूर्ण राज्यात आणि राज्यातील मतदारांमध्ये या सरकारबद्दल वेगळी अशी एक भावना निर्माण झाली आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यामातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार यांनी यावेळी केलेले आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार आज परत यावे अशी महाराष्ट्रातल्या मतदारांची इच्छा असे वाटत आहे.
कोल्हापूरातील परिस्थितीबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरातील आमच्या विचारांचे मतदार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आहे. गेल्या पाच वर्षांत मी विधानसभा सदस्य नसताना देखील मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणून कोल्हापूरचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या हातून समाजकल्याणकारी काम देखील झालेले आहे. मतदारांनी ठरवलेले आहे, की या निवडणूकीतून ते पून्हा एकदा मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील. राज्यातही अतिशय सुंदर परिस्थिती आहे. राज्यातल्या भगिनींची तर तीव्र इच्छा आहे, एकनाथ शिंदे पुन्हा एका मुख्यमंत्री म्हणून यावेत. हे कल्याणकारी योजनांचे राज्य पुन्हा यावे आणि आम्हाला अशाच पद्धतीने न्याय मिळावा, अशीही राज्यातल्या जनतेची इच्छा आहे.
विनोद तावडे हे ज्येष्ठ नेते आहेत, ते अशा पद्धतीचे काम नाही करणार, विरोधक अनेक टिका करत आहेत. लोकसभेच्या वेळी सुद्धा अशा अनेक बनावट कथा रचल्या होत्या, त्याचप्रमाणे हे ही आहे. निवडणूक म्हणल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत लढाई सुरू असते, ती मी लढत आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या मतदार संघात मला बहुमताने विजयी करतील, असेही क्षीरसागर म्हणाले.