महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जितो युथ विंग चेअरमनपदी रजत हरदी

06:22 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अपेक्स यूथ विंगचे चेअरमन म्हणून बेळगावचे रजत हरदी यांची निवड झाली आहे. 2024 ते 2026 या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. रजत हरदी हे जितोमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

Advertisement

रजत यांनी केएलएस जीआयटीमधून पदवी घेतल्यानंतर मुंबई येथील एनएमआयएमएस येथून पदवी घेतली. 2015 मध्ये त्यांनी जीतोमध्ये पदार्पण केले. आठ वर्षांमध्ये त्यांनी प्रारंभी बेळगावमध्ये व त्यानंतर कर्नाटक, केरळ, गोवा येथे जितोचे समन्वय म्हणून काम केले. यामुळे जितोचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या दोन वर्षात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन जितो अपेक्सच्या वरिष्ठांनी जितो युवा विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड केली. संपूर्ण भारतात जितो युथ विंगमध्ये 13 हजारहून अधिक सदस्य आहेत.

रजत यांना जितोमध्येच सक्रीय असलेल्या आई भारती व वडील महावीर हरदी यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच जितो अपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी, जे.ए.आय.एफ.चे अध्यक्ष गौतम जैन, सिद्धार्थ बनसाली, धीरज छाजेड, अशोक सालेचा, प्रवीण बाफना तसेच बेळगावचे संतोष पोरवाल, पुष्पक हणमण्णावर, हर्षवर्धन इंचल, अमित दोशी, मनोज संचेती यांचे मार्गदर्शन लाभले. युवा शाखेचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article