कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानचा चेन्नईवर दणदणीत विजय

06:58 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चेन्नईची पराभवाची मालिका कायम : सामनावीर आकाश मढवालचे 3 बळी तर वैभव सुर्यंवशीचा अर्धशतकी धमाका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मधील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने केला आहे. संघाने शेवटच्या लीग सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईने 20 षटकांत 8 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. यानंतर रॉयल्सने 188 धावांचे लक्ष्य 17.1 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. 29 धावांत 3 बळी घेणाऱ्या आकाश मढवालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानसाठी फायदेशीर ठरला. चेन्नईने फक्त 12 धावांत 2 विकेट गमावल्या. यानंतर, आयुष म्हात्रेने वादळी खेळी खेळली आणि पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. आयुष म्हात्रेने 20 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 43 धावा केल्या. त्याने 215 च्या स्ट्राईक रेटने धावा करत संघाचा चांगली सुरूवात करून दिली. यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिसने 25 चेंडूत 42 धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. शिवम दुबेनेही 39 धावांचे योगदान दिले. याशिवाय, एमएस धोनीने 16 धावा केल्या, इतर चेन्नईचे फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. यामुळे सीएसके संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 187 धावा करू शकला. राजस्थानकडून आकाश मढवाल व युद्धवीर सिंग यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

राजस्थानचा विजयी समारोप

चेन्नईने विजयासाटी दिलेल्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा संघाला स्थिर सुरुवात दिली. सुरुवातीला यशस्वीने स्फोटक फलंदाजी करत राजस्थानची धुरा सांभाळली. जलद खेळी करण्याचा प्रयत्न करताना, यशस्वी अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यशस्वीने 19 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली. दुसरीकडे, वैभवची सुरुवात संथ होती पण क्रीजवर सेट झाल्यानंतर त्यानेही आपला गियर बदलला.

वैभवची अर्धशतकी खेळी

सुरुवात संथ झाल्यानंतर, वैभवला कर्णधार संजू सॅमसनची उत्तम साथ मिळाली. यादरम्यान वैभवने 27 चेंडूत षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभवने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, कर्णधार संजू सॅमसन 31 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. संजू बाद होताच वैभव जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 33 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. वैभवने त्याच्या डावात 4 चौकार आणि 4 षटकारही मारले. यानंतर वैभव बाद झाल्यानंतर, संघाला सहज विजयाकडे नेण्याची जबाबदारी रियान पराग आणि ध्रुव जुरेलवर होती, परंतु नूर अहमदने रियान परागला त्याच्या फिरकीत अडकवले आणि त्याला बाद केले. यानंतर शिमरॉन हेटमायरने ध्रुव जुरेलसह संघाला 17 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 8 बाद 187 (आयुष म्हात्रे 43, आर. अश्विन 13, ब्रेविस 25 चेंडूत 42, शिवम दुबे 39, एमएस धोनी 16, युद्धवीर सिंग व आकाश मढवाल प्रत्येकी 3 बळी, हसरंगा व तुषार देशपांडे प्रत्येकी 1 बळी)

राजस्थान रॉयल्स 17.1 षटकांत 4 बाद 188 (यशस्वी जैस्वाल 36, वैभव सुर्यवंशी 57, संजू सॅमसन 41, ध्रुव जुरेल नाबाद 31, हेटमायर नाबाद 12, आर. अश्विन 2 बळी, अंशुल कंबोज व नूर अहमद प्रत्येकी एक बळी).

चेन्नईची पराभवाची मालिका कायम

राजस्थानने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव करून शानदार विजय मिळवला. या हंगामात राजस्थानचा हा चौथा विजय आहे. हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आणि गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल प्लेऑफच्या शर्यतीवर परिणाम करणार नाही. पण गुणतालिकेत दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा मात्र प्रश्न होता. अर्थात चेन्नईचा एक सामना बाकी असून या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article