For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडन गार्डन्सवर आज राजस्थान-कोलकाता आमनेसामने

06:55 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईडन गार्डन्सवर आज राजस्थान कोलकाता आमनेसामने
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

राजस्थान रॉयल्सचा सामना आज मंगळवारी दोनवेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्सशी होणार असून यावेळी ईडन गार्डन्सवर राजस्थानच्या भक्कम फलंदाजीसमोर सुनील नरेनचे गूढ उकलण्याचे गंभीर आव्हान उभे ठाकणार आहे. नरेनने 2012 आणि 2014 मध्ये ‘केकेआर’च्या विजेतेपदात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 2012 मध्ये संघात सामील झाल्यापासून नरेनने आपल्या धूर्त गोलंदाजीने ईडन गार्डन्सवर नेहमीच प्रभाव पाडला आहे आणि विरोधी फलंदाजांना आपण मोठा धोका असल्याचे सिद्ध केले आहे.

 

सनरायझर्स हैदराबादविऊद्धची (1/19) किंवा लखनौ सुपर जायंट्सविऊद्धची (1/17) कामगिरी लक्ष वेधून घेण्यात अयशस्वी ठरली असली, तरी त्या आठ षटकांमध्ये त्याने एकही चौकार दिला नाही. ही बाब ‘केकेआर’साठी फरक घडवून गेली. रविवारी येथे एलएसजीवर आठ गडी राखून मिळविलेल्या विजयात फिल सॉल्टने सामनावीराचा पुरस्कार मिळविला असला, तरी नरेननेच मधल्या षटकांमध्ये लखनौला अडविल्याने त्यांची 7 बाद 161 पर्यंतच मजल जाऊ शकली.

Advertisement

आज संजू सॅमसन, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर, ज्यांनी या हंगामात 155 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ते नरेनचा सामना कसा करतात त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. पंजाब किंग्जविऊद्धचा मागील सामना गमावल्यानंतर जोस बटलर खेळण्याइतका तंदुऊस्त झालेला आहे की नाही हे पाहावे लागेल. कोलकाताच्या बाबतीत मिचेल स्टार्कने एलएसजीविऊद्ध 28 धावांत 3 बळी घेऊन टीकाकारांचा आवाज बंद केला आहे. ‘केकेआर’चा कर्णधार श्रेयस अय्यरचा फलंदाजीतील खराब फॉर्म हा त्यांचा एकमेव कमकुवत दुवा म्हणता येतो. कोलकात्याची फलंदाजी या हंगामात मोठ्या प्रमाणात सॉल्ट-नरेनच्या फटकेबाजीवर आणि अंतिम षटकांत आंद्रे रसेलच्या फटकेबाजीवर अवलंबून आहे.

रिंकू सिंगने चार डावांत 63 धावा केल्या आहेत आणि त्याला फारशी संधी मिळालेली नाही, तर संघाचा उपकर्णधार नितीश राणा दुखापतीमुळे बाजूला पडला आहे. राजस्थान रॉयल्सकडे ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युजवेंद्र चहल आणि केशव महाराज अशी मजबूत गोलंदाजी असून रविचंद्रन अश्विन आजच्या सामन्यासाठी तंदुऊस्त झालेला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

संघ : कोलकाता नाईट रायडर्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रेहमान.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, अबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनीष कोटियन, केशव महाराज.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.