For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

06:55 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज गुरुवारी येथे राजस्थान रॉयल्सशी होणार असून आयपीएलच्या या हंगामातील पहिल्या विजयासाठी फलंदाजीतील प्रदर्शन सुधारण्याचे लक्ष्य दिल्ली बाळगून असेल. त्याशिवाय कर्णधार रिषभ पंतही आपली सुस्ती झटकून छाप उमटविण्याचा प्रयत्न करेल.

एका भीषण कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर 453 दिवसांनी पंतचे झालेले बहुप्रतीक्षित पुनरागमन हे फारसे चमकदथर राहिले नाही. त्याला केवळ 13 चेंडूंचा सामना करता येऊन त्यात 18 धावा काढता आल्या. पंजाब किंग्जने मुल्लानपूर येथील आपल्या नवीन घरच्या मैदानावील या सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला. पंतने यष्ट्यांमागे मात्र आपला नेहमीचा उत्साह दाखवला आणि जितेश शर्माच्या यष्टिरक्षणावरही त्याचा परिणाम झाला. आपल्या पहिल्या सामन्यात सुरुवातीच्या अस्वस्थतेवर मात केल्यानंतर पंत आपला सूर त्वरित परत मिळविण्यास उत्सुक असेल. यावेळी त्याचा सामना ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांच्याशी होणार असून ही लढत हे मुख्य आकर्षण असेल. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना डावाची सुऊवात करायला लावले होते. कारण ते दोघे चांगल्यापैकी धावा जमवतील आणि त्यामुळे खाली फलंदाजीस येणाऱ्या पंतवर फारसा दबाव येणार नाही अशी त्यांची योजना होता. पण त्या दोघांना चांगल्या सुऊवातीचा फायदा घेता आला नाही आणि लवकरच पंतवर दडपण आले. यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलच्या नाबाद 32 धावा ही दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील एकमेव चमकदार बाजू होती. पोरेलने त्यांना एका टप्प्यावरील 7 बाद 138 अशा अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढून 9 बाद 174 वर पोहोचविले.

Advertisement

दिल्लीकडे गोलंदाज कमी असल्याने पोरेलचा ‘इम्पेक्ट प्लेयर’ म्हणून वापर करण्यात आला. इशांत शर्माच्या पावलाला दुखापत झाल्याने ही समस्या आणखीनच वाढली आहे. हा वेगवान गोलंदाज आणखी काही सामन्यांना मुकू शकतो. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीला येथे लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध काही सुऊवातीच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्या दिवशी सवाई मानसिंग स्टेडियमवरील कोरड्या खेळपट्टीवर जे घडले ते पाहता कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दिल्लीच्या फिरकी जोडीवर मोठी जबाबदारी असेल.

Advertisement

त्या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 82 धावांची खेळी केल्याने रॉयल्सने 20 धावांनी विजय मिळवला. सलग पाचव्यांदा हंगामातील संघाच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला सॅमसन आगामी टी-20 विश्वचषकात उतरणार असलेल्या भारतीय संघातील यष्टिरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठीचा जोरदार दावेदार बनला आहे. रियान परागने देखील धावा जमविलेल्या असल्याने रॉयल्सचे पहिले चार फलंदाज हे दिल्लीच्या गोलंदाजीसमोर तगडे आव्हान निर्माण करतील. त्यामुळेच कुलदीप आणि अक्षरची मधली षटके निर्णायक ठरतील.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजीही प्रभावी ठरली असून नवीन चेंडूवरील त्यांच्या माऱ्याचे नेतृत्व ट्रेंट बोल्टकडे आहे. संदीप शर्मानेही डेथ ओव्हर्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने मागील सामन्यात 17 व्या षटकात के. एल. राहुलला 58 धावांवर बाद केले आणि अंतिम षटकात निकोलस पूरनलाही रोखले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंट्सना 6 बाद 173 वर रोखता आले.

संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फेरेरा, जोस बटलर, कुलदीप सिंग, कुणालसिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, यजुवेंद्र चहल आणि तनुष कोटियन.

दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धूल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिक दार, रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा आणि शाई होप.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
×

.