कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थान आज मुंबईला रोखण्याच्या मोहिमेवर

06:31 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थान रॉयल्स आज गुऊवारी येथे होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविऊद्ध नव्या जोमाने मैदानात उतरेल. पाच वेळच्या विजेत्या संघाची इंडियन प्रीमियर लीगमधील वाढणारी गती रोखण्याचे त्यांचे ध्येय असेल. सोमवारी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी केलेली असल्याने रॉयल्सना संधी गमावलेल्या मोहिमेत आशेचा किरण सापडला आहे.

Advertisement

यजमान संघाला अजूनही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची धूसर संधी आहे, परंतु खोलवर पाहता व्यवस्थापनाने त्यांचे भविष्य स्वीकारले आहे, असे दिसून येते. कर्णधार संजू सॅमसनला झालेल्या ‘साईड स्ट्रेन’मुळे सूर्यवंशीच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आणि क्रिकेट जगताचा चर्चेचा विषय बनण्यासाठी त्याला फक्त तीन डाव लागले. सॅमसन शेवटचा 16 एप्रिल रोजी खेळला होता आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल पुन्हा डावाची सुऊवात करतील. गुजरात टायटन्सविऊद्धच्या त्यांच्या 166 धावांच्या भागीदारीमुळे 210 धावांचे लक्ष्य गाठण्याचे काम सोपे बनले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या गोलंदाजांना आव्हान दिल्यानंतर जसप्रीत बुमराहविऊद्ध सूर्यवंशी कसा खेळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

तळाकडे शिमरॉन हेटमायरवर दबाव असेल, जो या हंगामात त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसलेला नाही. याचे एक कारण म्हणजे खेळपट्ट्या संथ झालेल्या आहेत. खेळपट्ट्या मंदावल्या आहेत. विजयाच्या स्थितीत असतानाही राजस्थानला सामने संपवण्यात अपयश आलेले आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चरने यश मिळवून दिले आहे, परंतु प्रति षटक जवळपास 10 धावा दिल्या आहेत. संदीप शर्मा देखील थोडा महागडा ठरला आहे. खरे तर त्यांच्या कोणत्याही आघाडीच्या गोलंदाजाचा इकोनॉमी रेट 9 पेक्षा कमी नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी बुमराहचे पुनरागमन आणि गुणतालिकेत मुसंडी मारणे हे एकाच वेळी झाले आहे. नेहमी संथ सुरुवातीसाठी विख्यात मुंबईने आता उसळी घेत पाच विजय मिळवले आहेत आणि त्यांना थांबवता येणार नाहीत असे दिसते. मागील सामन्यात मुंबईसाठी घडलेली एक सकारात्मक बाब ही पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशच्या कामगिरीची होती. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि एक बळीही घेतला. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मासारखे खेळाडू फॉर्मात आले असून मुंबईचा संघ योग्य वेळी शिखरावर पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. विरोधी संघांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.

संघ-राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, कुणाल सिंह राठोड, युधवीर सिंह चरक, नितीश राणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, फजलहक फाऊकी, अशोक शर्मा, जोफ्रा आर्चर.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हन जेकब्स, रायन रिकल्टन, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजीथ, नमन धीर, राज बावा, विघ्नेश पुथूर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्वनी कुमार, रीस टोपले, लिझाद विल्यम्स, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Next Article