महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थान मंत्रिमंडळाचा झाला विस्तार

06:21 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किरोडीलाल मीणा, राज्यवर्धन राठोडसह 22 मंत्री शपथबद्ध

Advertisement

► वृत्तसंस्था / जयपूर 

Advertisement

राजस्थानातील भजनलाल शर्मा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात ज्येष्ठ भारतीय जनता पक्ष नेते किरोडीलाल मीणा यांच्यासह राज्यवर्धनसिंग राठोड यांचाही समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात 12 कॅबिनेट दर्जाचे तर 10 राज्यमंत्री आहेत. विस्तार करताना जात, महिला आणि इतर समाजघटकांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राजस्थानच्या राजवभनात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात राज्यपाल कलराज मिश्र यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. नव्या मंत्र्यांचे विभागवाटप त्वरित होणार आहे.

नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

शनिवारी शपथग्रहण केलेल्या 22 मंत्र्यांपैकी 17 चेहरे नवे आहेत. काही मंत्र्यांची तर आमदार होण्याची ही पहिली किंवा दुसरीच वेळ आहे. तरीही त्यांना मंत्री होण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक दृष्टीसमोर ठेवून हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आल्याचे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले.

पाच वर्षांनंतर पुन्हा भाजप

गेल्या 30 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाला सलग दोनदा सत्ता मिळालेली नाही. एकदा भारतीय जनता पक्ष आणि एकदा काँग्रेस अशीच निवड या राज्यातील मतदारांनी केली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे यावेळी परंपरेनुसार भाजपला सत्ता मिळाली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 199 पैकी 115 जागा मिळाल्या आहेत.

राजस्थान मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री

किरोडीलाल मीणा, मदन दिलावर, राज्यवर्धनसिंग राठोड, गजेंद्रसिंग खिमसार, बाबुलाल खिराडी, जोगाराम पटेल, सुरेश सिंग रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीणा, कन्हय्यालाल चौधरी आणि सुमित गोडारा

राजस्थान मंत्रिमंडळातील राज्यमंत्री

संजय शर्मा, गौतम कुमार डाक, झाबरसिंग खार्रा, सुरेंद्र पाल सिंग, हीरालाल नागर, ओटाराम देवासी, मंजू बाघमार, विजय सिंग चौधरी, के. के. बिष्णोई आणि जवाहरसिंग बेडहाम. यांच्यापैकी प्रथम पाच मंत्र्यांना स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. तर ऊर्वरित पाच मंत्री हे राज्यमंत्री असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीतील उमेदवारही मंत्री

राजस्थानात 200 जागा आहेत. 199 स्थानी निवडणूक झाली असून 1 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  सुरेंद्र पाल सिंग मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अशी घटना राजस्थानात प्रथमच घडली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article