For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन वर्षांपासून संतोष गावकर होते बेपत्ता, सापडला पत्ता

12:22 PM Jun 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
तीन वर्षांपासून संतोष गावकर होते बेपत्ता  सापडला पत्ता
Rajapur
Advertisement

वार्ताहर
राजापूर
गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले अणसुरेचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गावकर घरी परतल्याची माहिती कुटुंबियांनी नाटे पोलिसांना दिली आहे.
अणसुरे आडीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य संतोष दत्ताराम गावकर सप्टेंबर 2021 पासून बेपत्ता होते. तशी तक्रार सागरी पोलीस ठाणे नाटे येथे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली होती.
तीन वर्षाच्या कालावधीत आपण पालघर वाडा, नाशिक या भागात वास्तव्यास असल्याचे कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.