कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Operation Sindoor वर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?, पाकिस्तान आधीच बरबाद झालेला...

04:58 PM May 07, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

ज्या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक जातात तिथे सिक्युरीटी का नव्हती?

Advertisement

Operation Sindoor Raj Thackeray : भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानातील नऊ दहशतावादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे हल्ले करण्यता आले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला असं सांगितले जात आहे.

Advertisement

ऑपरेशन सिंदूर असं या एअर स्ट्राईकचे नाव असून जगभरासह, देशातील विविध क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हल्ल्या संदर्भात केंद्र सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचं उत्तरं युद्ध नसतं, अशी परखड मतं व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक संदर्भात ते म्हणाले, भारतात जम्मु-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यावर पहिलं ट्वीट करुन सांगितलं होतं की, ज्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांना धडा शिकवला पाहिजे. इतका कठोर धडा की, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे. परंतु दहशतवादी हल्ल्याचं उत्तरं युद्ध हे नसतं.

अमेरिकेत दोन टॉवर्स पाडले. पॅंटगॉनवर हल्ला केला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. देशात युद्ध परिस्थिती आणायची, मॉकड्रील होणार, सायरन वाजवणार असं भासवायचं. मुळात ही गोष्ट का घडली याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले, पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. त्याला आणखी काय बरबाद करणार? हल्ला केलेली अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक जातात तिथे सिक्युरीटी का नव्हती? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. देशात ऑपरेशन करुन त्यांना शोधून काढणे आवश्यक आहे. एअर स्ट्राईक करुन लोकांना भरकटवणे हे उत्तर होऊ शकत नाहीत.

ऑपरेशन सिंदूर संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्या पाहिजेत. हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियामध्ये होते. तो दौरा सोडून ते बिहारला कॅपेनला गेले. केरळमध्ये गेले. जर इतकी गंभीर गोष्ट होती तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. त्यानंतर येवून मॉकड्रील किंवा एअर स्ट्राईक करणे हे उत्तर नाही.

हल्ला केलेल्या अतिरेक्यांना शोधून काढून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. देशातील प्रश्न संपत नाहीयेत आणि तुम्ही युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार आहात. हल्ली नाक्या नाक्यावर ड्रग्ज मिळतात. ते कुठून येतात याच्या खोलाशी जाण्याची गरज आहे. महाविद्यालयीन तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकत आहेत त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. युद्ध हे काही उत्तर नाही.

Advertisement
Tags :
#narendra modi#Pahalgam#pakistan#Raj Thackeray#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaOperation SindoorPahalgam Attack Impact
Next Article