For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोनाटो विश्वचषकासाठी रायझा, नारुकाचे संघात पुनरागमन

06:46 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोनाटो विश्वचषकासाठी  रायझा  नारुकाचे संघात पुनरागमन
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या निवड समितीने शुक्रवारी इटलीतील लोनाटो येथे होणाऱ्या आगामी आयएसएसएफ शॉटगन विश्वचषकासाठी संघ जाहीर केला.

पॅरिस ऑलिम्पियन रायझा धिल्लन आणि अनंतजीत सिंग नारुका यांचे भारतीय वरिष्ठ संघात पुनरागमन झाले. वर्षातील चौथा विश्वचषक टप्पा 4 ते 14 जुलै दरम्यान होणार आहे. गेल्या आठवड्यात सुहल, जर्मनी येथे झालेल्या ज्युनियर विश्वचषकात रायझाने रौप्यपदक जिंकले. माझे लक्ष सध्या जुलैमध्ये होणाऱ्या लोनाटो विश्वचषकावर आहे आणि या वर्षी इटलीत झालेल्या माझ्या चांगल्या कामगिरीमुळे मी आत्मविश्वास मिळवू शकेन, असे ती म्हणाली. या महिन्याच्या सुरुवातीला तिसऱ्या निकोसिया शॉटगन विश्चषकात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये जिथून भारताने नवीन ऑलिम्पिक ट्रॅप मिश्र सांघिक स्पर्धेत त्यांचे पहिले  कांस्यपदक मिळविले. फक्त पुरुषांच्या स्कीटमध्ये अनुभवी मैराज अहमद खान आणि महिलांच्या स्कीटमध्ये माहेश्वरी चौहान यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. अनुभवी झोरावर सिंग संधू आणि 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता लक्ष्मी शेओरन यांचा पुरुषांच्या ट्रॅपमध्ये पुन्हा पुनरागमन झाले आहे.

Advertisement

दोन सुवर्णपदकांसह पाच वरिष्ठ आयएसएसएफ पदके जिंकणारी भारताची सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय महिला स्कीट शूटर गनेमत सेखॉन, निकोसिया विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही ती खेळताना दिसेल. ट्रॅप मिश्र संघाची जबाबदारी अनुक्रमे नीरु धांडा आणि लक्ष्मी शेओरन आणि प्रीती रजक आणि झोरावर यांच्या खांद्यावर असेल. संघातील इतर सदस्यांमध्ये प्रगती दुबे-महिला ट्रॅप, जसविंदर सिंग-पुरुष ट्रॅप आणि भवतेघ सिंग गिल-पुरुष स्कीट यांचा समावेश आहे.

भारतीय संघ : स्कीट पुरुष-अनंतजीत सिंग नारुका, मैराज अहमद खान, भवतेघ सिंग गिल, स्कीट महिला-रायजा धिल्लन, गनेमत सेखॉन, माहेश्वरी चौहान, ट्रॅप पुरुष- लक्ष्मी शेओरन, झोरावर सिंग संधू, जसविंदर सिंग, ट्रॅप महिला-नीरु धांडा, प्रगती दुबे, प्रीती रजक.

Advertisement
Tags :

.