गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात निम्माच पाऊस,यंदा पाणी टंचाईचे सावट
पाणी जपून वापरावे, जलसंपदा विभागाचे आवाहन
राधानगरी प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा निम्याहून कमी पाऊस झाला आहे.अवकाळी पाऊसही न झाल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे.राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात २०१९ साली ६९१२ मिलिमीटर पाऊस नोंदला होता.यावर्षी फक्त ३८६७ मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने डोंगरदऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी आहेत.त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ शकते.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेली पाच वर्षांच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. जून महिन्या पासून पाऊस कमी झाल्याने जमीन,जंगल दऱ्यामध्ये पाणी कमी प्रमाणात मुरले आहे.त्यामुळे जमिनीच्या पहिल्या थरामध्ये पाणी कमी असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील जंगल दऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी झाले आहेत.त्यामुळे धरणात येणारे ओघळाचे पाणी कमी झाले आहे.
धरणाची ओळख असलेला राधानगरी तालुक्यात या वर्षी तालुक्यातील तीन धरणे कमी अधिक प्रमाणात भरल्याने संभाव्य पाणी व वीज टंचाई लक्षात घेऊन पाणी या वर्षी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे, अद्यापही डिसेंबर अखेर व पुढील 15 जूनचा काळ म्हणजेच सहा महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.
पाच वर्षातील पाणीसाठा.टी एम सी मध्ये व पाऊस
सन पाणीसाठा पाऊस
2019 7.19 6912मी मी
2020 7.17 4556 मी मी
2021 7.64 4945 मी मी
2022 7.47 4467मी मी
2023 7.72 3867 मी मी