For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्वतांवर तयार होते इंद्रधनुष्य

06:12 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पर्वतांवर तयार होते इंद्रधनुष्य
Advertisement

अजब आकृत्या निर्माण करणारे पर्वत

Advertisement

जगात पर्वतांचे सौंदर्य प्रत्येकाच्या मनाला आकर्षून घेणारे असते. सर्वसाधारणपणे पर्वतांमध्ये रंग हवामानानुसार बदलतो. याचमुळे काही पर्वत खास ऋतूत आकर्षक दिसून येतात. परंतु चीनच्या झांग्ये डॅनक्सिया नॅशनल जियोग्राफिकल पार्क वेगळाच आहे.  गांसू प्रांतातील किलियन पर्वताच्या पूर्व तळानजीक या पार्कच्या पर्वतांचा रंग प्रत्येक ऋतून इंद्रधनुष्यी रंगाच्या छटांची उधळण करत असतो.

झांग्येच्या डॅनक्सियामध्ये अनेक लाल रंगाचे खडक आहे, यातील काही शेकडो मीटर उंच आहेत. या संरचना मैदानी भागातून अत्यंत भव्य आणि आकर्षक दिसून येतात. अनेक लाल खडक हे महाल, शंकू, टॉवर, मनुष्य आणि प्राणी, पक्षी यासारख्या अनोख्या आणि रहस्मय आकृत्यांसारखे दिसून येतात. धुकं आणि ढगांदरम्यान दिसून येणारी त्याची शिखरं अद्भूत दृश्य निर्माण करतात.

Advertisement

हे स्थान लाखो वर्षांपूर्वी समुद्राचा हिस्सा होते. टेक्टोनिक प्लेट्सच्या धडकांमूण्s हे पर्वत तयार झाले आहेत. या भागात अनेक नद्यांची निमिर्ती झाली, तेव्हा लाल बलुआ दगड जमा झाला. कालौघात अनेक आवरण असलेले पर्वत तयार झाले, ज्यात माती आणि दगडामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात लोह होते. याचमुळे या आवरणांचा रंग वेगवेगळा आहे. नदीचा प्रवाह आणि वाऱ्यामुळे या रंगीत आवरणांची निर्मिती झाली आहे. याच रंगीत आवरणांनी झांग्ये डॅनक्सिया भू-आकृती क्षेत्रासाठी ‘इंद्रधनुष्य पर्वत’ नाव जन्माला घातले आहे.

पहिला व्यूइंग प्लॅटफॉर्म सर्वात मोठा आणि प्रवेशद्वारानजीक आहे. व्यूइंग प्लॅटफॉर्मपयंत पोहोचण्यासाठी फार पायऱ्या चढून जावे लागत नाहीत. तेथूनच उंच, रंगबिरंगी पर्वतांचे दृश्य दिसते. काही लोकांना या पर्वतांच्या आकृतींमध्ये बुद्धाची पूजा करणारे भिक्षू, आगीच्या समुद्रात पळणारी माकडं आणि इंद्रधनुष्यी पर्वत दिसू लागतात.

डॅनक्सिया झांग्येमध्ये अनेक खास ठिकाणं असून तेथून दृश्य अत्यंत अदभूत दिसते. काही ठिकाणी सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत अनोखे दिसते, तर प्रसिद्ध सात रंगाचा पंखा तिसऱ्या अवलोकन व्यासपीठावरून दिसून येतो. पर्वताला जिवंत रंगांनी रंगविण्यात आल्याचे वाटू लागते.

290 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेला भाग डॅनक्सियाशान भूवैज्ञानिक पार्कचा हिस्सा असून यात नद्या, जंगल आणि विशाल डॅनक्सियन पर्वतीय संरचना सामील आहेत. 2009 मध्ये याला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात स्थान मिळाले होते.

Advertisement
Tags :

.