कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार

06:35 AM Jun 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धरमशाला येथे 15-20 कामगार पुरात वाहून गेले, 2 मृतदेह हाती

Advertisement

वृत्तसंस्था/ धरमशाला

Advertisement

हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. कुल्लूमधील पुरानंतर धरमशाला येथेही परिस्थिती बिकट बनली आहे. बुधवारी जिह्यातील खनियारा मानुनी खाडची येथे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे मानुनी येथील इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत प्रकल्पाच्या कामात गुंतलेल्या 100 कामगारांपैकी सुमारे 20 ते 25 कामगार वाहून गेल्याचे समजते. मानुनी खाडमध्ये दोन मृतदेह सापडले आहेत. एसडीआरएम टीम, स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत, महसूल विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन मदत व बचावकार्य करत आहे. प्रकल्पात गुंतलेले स्थानिक लोक सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे प्रकल्पस्थळी काम करणे अशक्य झाल्यामुळे बरेच कामगार शेडमध्ये थांबलेले असताना नाल्याचे सर्व पाणी वसाहतीकडे घुसल्यामुळे विश्रांती घेणारे कामगार वाहून गेले. पाण्यात वाहून गेलेले बहुतेक कामगार श्रीनगरचे रहिवासी असल्याचे सांगितले जाते. सायंकाळपर्यंत दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article